मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चक्क्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि नामदेव काशिनाथ पाटील (आप्पा) यांच्या मार्गदर्शनाखाली, आम्ही वारंजी गटातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करू.
संचालक - मैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा. काँग्रेस पक्षाच्या वतीने वारंजी जिल्हा परिषद गटातून अधिकृत उमेदवार.
काँग्रेस पक्षाच्या वतीने कोयनावसाहत पंचायत समिती गणातून अधिकृत उमेदवार. जनसेवेच्या संस्कारांनी युक्त.
काँग्रेस पक्षाच्या वतीने वारंजी पंचायत समिती गणातून अधिकृत उमेदवार. गावाच्या विकासासाठी समर्पित.
आपल्या सहकार्याने व विश्वासाच्या बळावर वारंजी जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही खालील बाबींवर विशेष भर देऊ. प्रत्येक क्षेत्रात प्रामाणिक आणि पारदर्शक कार्य करण्याचे आमचे वचन आहे.
गावांना जोडणार्या प्रमुख रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण, अंतर्गत रस्ते व शेतरस्त्यांची दुरुस्ती.
जिल्हा परिषद शाळांमध्ये आवश्यक मौलिक सुविधा, स्वच्छ वातावरण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण.
प्राथमिक आरोग्यकेंद्रांचे सुदृढीकरण, वेळोवेळी आरोग्य शिबिरे आयोजित करून वैद्यकीय सेवा.
दलित व मागासवर्गांच्या वस्त्यांमध्ये पाणी, गटर, रस्ते, प्रकाश व्यवस्था व मूलभूत सुविधा.
संजय गांधी निराधार योजना, धरकुल योजना व कल्याणकारी योजनांचा पारदर्शक लाभ.
येणाऱ्या काळात वारंजी जिल्हा परिषद गटाचा आणि कोयनावसाहत पंचायतसमिती गणाचा सर्वांगीण आणि गतिमान विकास साधण्यासाठी आम्ही ठोस उपाययोजना राबवू. प्रत्येक नागरिकाच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्याचे आमचे ध्येय आहे.

शेती व पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी, शाश्वत आणि प्रभावी पाणीपुरवठा व जलसंधारण उपाययोजना राबवणे.

स्थानिक युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण, स्वयंरोजगार उपक्रम व रोजगाराच्या ठोस संधी उपलब्ध करून देणे.

महिला बचत गटांना आर्थिक बळ देऊन, उद्योग प्रशिक्षण व स्वावलंबनाच्या संधी निर्माण करणे.

स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी गावे घडवण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन व पर्यावरणपूरक उपक्रमांची अंमलबजावणी.

शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, योग्य मार्गदर्शन आणि शासकीय अनुदानाचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देणे.
एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून वारंजी गटातील प्रत्येक नागरिकाचा आवाज बनून काम करण्याची संधी मला द्यावी. विकासाचा नवा अध्याय सुरु करण्यासाठी मला आपले मोलाचे मत, आशीर्वाद आणि भव्य पाठबळ द्यावे, ही नम्र विनंती.
आपली नम्र, सौ. सुनंदा नामदेव पाटील (माई)
काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार, वारंजी जिल्हा परिषद गट

नेते पार लागे असतात, काहींच्या वाटल्या सत्ता येते, काहींच्या वाटल्या प्रतिष्ठा... पण जनतेच्या मनात कायमची जागा मात्र त्यांनी मिळते ज्यांनी स्वतःचे आयुष्य पूर्णपणे समाजासाठी वाहून घेतले.
आपल्या बालपणापासून नेतेपण नव्हे, घरी गोसेवा सुरु केली. ही केवळ सेवा नव्हती, ती त्यांच्या संस्कारांनी मनातील भीती जनसेवेचे वातावरण निर्माण करण्याचा सुरुवात होती.
१९९० साली आपली ट्रक व्यवसायाची सुरुवात केली. कठोर परिश्रम, सरळपणा आणि प्रामाणिकपणा यांच्या जोडावर हा व्यवसाय फुलत गेला. व्यवसायाच्या माध्यमातून अनेक लोकांना मदत मिळाली. "लोकांची कामे करण्याची संधी मिळाली, हे भाग्य" एवढेच ते म्हणत.
२००० साली सरपंच निवडणूक हा होता त्यांच्या जनसेवेच्या कार्यकारी निर्णयाचा पहिला टप्पा. त्यांनी मनापासून ही जबाबदारी प्रामाणिकपणे पाळली. गावाचे सर्वच काम, सर्वांची कार्यकारी व्यवस्था, दूरदृष्टीचा आणि विकासनिष्ठेचा नमुना होता.
"गावचा आर्थिक पाया मजबूत नसेल तर विकास शक्य नाही" या विचाराने २००५ मध्ये गावाची पतसंस्थेची स्थापना केली. कमी व्याजदर, पारदर्शक व्यवहार आणि सर्वसमावेशक सुविधा - ही त्यांच्या पतसंस्थेची वैशिष्ट्ये.
२००७ साली त्यांची पंचायत समिती सदस्य म्हणून निवड झाली. आता त्यांच्या कामाचा परिसर गावापुरता न राहता तालुकास्तरावर विस्तरला. त्यांच्या मनात गावाचा विचार नेहमी ठेवून त्यांनी एकामागून एक विकासाची कामे केली.
शाळा दुरुस्ती आणि सुविधा
पाणी योजनांचे काम
रस्ते सुधारणा व बांधकाम
महिलांच्या प्रशिक्षण कार्यक्रम

कोरोनाच्या भीषण परिस्थितीत अनेक नेते घरात लपले, पण आप्पा मात्र धैर्याने जनतेशोबत अग्रेसर राहिले. औषधे, आहार, गरजूंची मदत - त्यांची कोणतीही सीमा आखली नाही.
जो गावकरी आजारी पडला, त्याच्यावर त्यांनी स्वतः लक्ष ठेवले. ज्यांच्याकडे खाण्याची व्यवस्था नव्हती, त्यांच्यासाठी त्यांनी स्वतःचे हात पुढे केले. या काळात लोकांनी त्यांचे "मनाने मोठे" नेतृत्व जवळून अनुभवले.
२०१९ ते २०२४ दरम्यान एकूण विकास निधी
विकासाच्या कामांचा लाभ
पूर्ण झालेले विकास प्रकल्प
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत जनतेचा आशीर्वाद देऊन आप्पा पुढे एकदा सेवेसाठी तयार राहतील. हे नव्हे, विकासाचे काम बोलते. त्यांच्या प्रवासाचा पुढचा टप्पा आता सुरु होतो आहे.
"आप्पा पुढे होत. कारण त्यांच्या नेतृत्वाखाली आपले गाव सुरक्षित आहे"
गावातील प्रत्येक घराशी संवाद साधणारे, अडचणीत हात देणारे, संकटात धैर्याने उभे राहणारे आणि विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणारे असे हे नेतृत्व गावाला लाभले याचा प्रत्येक गावकऱ्याला अभिमान आहे.
वारंजी जिल्हा परिषद गट - आपल्या सेवेसाठी